संदीप काळे - टाका घालताना बाई अशी करू ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
टाका घालताना बाई
अशी करू नये घाई
तुझ्या नाजुक बोटाला
खोल टोचेल ग सुई
सुई टोचता बोटाला
कळ सर्वांगाला येते
दुःख इवलेसे तरी
मन व्यापून जाते
दुःख फुलत राहते
दुःख सलत राहते
सांधताना सोसण्याची
रीत सुई शिकवते
अशा फाटल्या मनाला
पुन्हा ठिगळ जोडून
संयमाची गोधडी घे
अंगभर पांघरून
टाका घालताना बाई
अशी करू नये घाई
टोचणार्या सुईलाच
थोर मानावे ग आई....!
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018

TOP