सुनीता झाडे - काही पाऊस अलवार कणाकणाला ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
काही पाऊस
अलवार कणाकणाला लपेटत
मातीच्या कुशीतलं बी रुजवणारा...
काही पाऊस
मुसळधार
मातीच्या अंगाला छिन्न - विछिन्न करणारा...
काही पाऊस
फक्तच विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट
अन् मातीचे रुदन...
काही पाऊस
ढगा आड लपलेला
नुसती अन नुसतीच वाट पाहायला लावणारा
मरु मरेस्तोवर...
कोण गर्भात बीज नसलेला पाऊस
कुठे वांझ राहिलेली माती...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP