मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
तू खुशाल म्हण, ` ही चंचलत...

उदयभानू हंस - तू खुशाल म्हण, ` ही चंचलत...

अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


तू खुशाल म्हण, ` ही चंचलता '
तू खुशाल म्हण, ` ही दुर्बलता '

ही तर हृदयाची अगतिकता...जडून गेले प्रेम तुझ्यावर

जो सरेल तो हा स्नेह नसे
हा दो घटिकांचा मेळ नव्हे
ही धार जणू तलवारीची
हा भातुकलीचा खेळ नव्हे

तू खुशाल म्हणे, ` ही नादानी '
तु खुशाल म्हण, ` ही मनमानी '

माझ्या रेषांमधून येई तुझ्या छबीचे प्रत्यंतर !

मी चातक, तर तू वर्षाजल
मी लोचन आहे, तू काजळ
तू पदर आणि मी अश्रूजल
मी तहानेला, तू गंगाजल

तू खुशाल म्हण ` हे वेडेपण...'
तू खुशाल म्हण ` हे अल्लडपण...'

ओळख माझी देताना नाव तुझे येई ओठांवर !

मज अजून हे कळले नाही
तुज भेटाया का आलो मी ?
तू स्पंदन माझ्या हृदयाचे
बिंब तुझे अन् झालो मी

तू खुशाल म्हण ` हे स्वप्नच ना ? '
तू खुशाल म्हण ` अघटित घटना... ' !

प्रत्येकच वाटेवरुनी मी तुझ्याच आलो दारावर !

मज सोसवे न ही प्रेमव्यथा
मज सांगवे न ही कुणा कथा
ज्वालेसम येइ न जळताही
अश्रूसम ये न तरळताही

तू खुशाल म्हण, ` वाया गेला '
तू खुशाल म्हण, ` हा अलबेला '

तुज स्मरता स्मरता पडला मज माझाच विसर !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP