दीपाली पाटील - फुलं उमलली अगदी आपोआप फु...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
फुलं उमलली अगदी आपोआप
फुलपाखरं भिरभिरली तीही आपोआपच
पायथ्याशी वाहणार्या झर्यासारखी
कौलावरून वाहणार्या वार्यासारखी
पण पोचतील का माझ्या आठवणी तुझ्यापर्यंत
दगड - गोट्यांतून, काट्याकुट्यांतून
अशाच आपोआप ?
आणि
ओढला गेलाच कधी एखादा ओरखडा
माझ्या कोमल मनावर
तर मारशील ना
लहानशी फुंकर...
तीही आपोआपच ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP