श्रीपाद जोशी - पुन्हा नव्याने डाव मांडल्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पुन्हा नव्याने डाव मांडल्यावरती
झाली आहे हार जिंकल्यावरती
मर्यादांचा प्रवेश समजुन आला
तुझ्या किनारी लाट थडकल्यावरती...
काच तडकली होती आकाशाची
खोल दरीतुन सूर्य उगवल्यावरती
टाकेसुद्धा किती किती हळहळले...
पुन्हा एकदा वीण उसवल्यावरती...
पोकळतेचे टोक टोचता फुटला
फुगा दूरवर उंच उडवल्यावरती
मीही थोडा खेटुन असलो होतो
शेजारी ती माझ्या बसल्यावरती !
काय नेमके मागे उरले आहे... ?
इथले आता सगळे सरल्यावरती... ?
पुन्हा नव्याने काही सुचले नाही
कवितेमधुनी तुला वगळल्यावरती...
घाटांचा तो प्रवास अनवट होता...
पश्चिमेस हा सूर्य सरकल्यावरती
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2017
TOP