अरविंद वाळिंबे - माझ्या मनीच्या हळव्या शब्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझ्या मनीच्या हळव्या शब्दांना
अचानक अशी चैत्रपालवी फुटते
मनातल्या सुप्त भावमोहरांची
एक कविता कशी फुलून येते
मीच माझ्या खुळया शब्दांना
सजवत असतो , नटवत असतो
अपुर्या शव्दांतल्या आर्त भावना
थोपवत जातो , आवरत जातो
शब्द मात्र फसवे, नटखटा
भावनांच्या सायीवरुन उतू जातात
काळीज कसे व्याकुळ करतात
आता कविता फुलली तर
शब्दांना हळूच माघारी धाडतो
नि:शब्द भावनांची एक सतार
अलिप्त होऊन छेडत बसतो....
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP