मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
मंद वाहताना वारा हले हालक...

प्रा. पुरुषोत्तम पाटील - मंद वाहताना वारा हले हालक...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.

मंद वाहताना वारा
हले हालकी डहाळी
फ़ुलं हासून-नाचून
माझ्या भरती ओंजळी

ओंजळीतला फ़ुलवरा
केला रिता तिच्या हाती
हातातली काकणेही
किणकिणती...लाजती

सखीही ती लाजवंती
धीट झाली कशी परी
मीच ओपलेली फ़ुलं
उधळिली माझ्या शिरी !

देवालयी देवालाही
हेवा असेल वाटला
रीत पाहून भक्तीची
असेल ना अचंबला

घटकेचा देवपणा
तिने दिधला असला
नि हयातीभर मला
काळ्या पोतीत बांधला !

N/A

References :
९३७२०२०१७३
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP