रेखा खराबे - काल कुठंतरी सही करताना मा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
काल कुठंतरी सही करताना
माझं मलाच कळेनासं झालं
ते नाव, ती अक्षरं
अनोळखी, अपरिचित
वाटत राहिली
‘ मी कोण ? ’ ‘ माझं नाव काय ? ’
हे मी सगळंच विसरून गेले आहे की काय ?
त्या कागदावरची नक्षीच फक्त
निरखत राहिले मी...वेड्यागत
तंद्रीतून भानावर आले
ती काहीशी दचकतच
आणि काहीशी आनंदातही !
दचकत अशासाठी, की
आजवर कैक नात्यांच्या गुंतवळीत
विसररूनच गेले होते मी माझं अस्तित्व
आणि आनंदात अशासाठी, की
‘ मी कोण ? ’
‘ माझं नाव काय ? ’
असे निदान प्रश्न तरी पडायला
आता सुरवात झाली आहे... !
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017

TOP