रामधारी सिंह ‘ दिनकर ’ (१९०८-१९७४ ) - सागरतीरीच्या वाळूवर लिहिल...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सागरतीरीच्या वाळूवर
लिहिले होते नाव तुझे मी जेव्हा...
आठवतंय ना,
तू हसली होतीस
अन् होतीस म्हणाली :
‘ हा काय वेडगळपणा ?
रममाण होउनी इतका
जणू कोरिशी नाव शिलेवर...!
पण मला वाटते, हे लोभस रेखांकन
होईल अमर...
वार्याचे तर नाव नको...
नाहीच पुसू शकणारही
याला सागर ! ’
आणिक तेव्हापासूनी खरोखर
नाव तुझे मी अशा प्रकारे
लिहिले आहे की
सागरलहरी टाकु न शकतिल
त्याला पुसुनी
फुलात असतो सुगंध जैसा
नाव तुझे तैसेच गुंफिले
मी माझ्या या गीतामधुनी
बघ, अवघ्या विश्वास गीत हे
जाईल पसरुनी
आणि पिढ्या त्या
जन्मच ज्यांनी
घेतला न अजुनी
नाव तुझे घेतील...
...घेतील पुन:पुन्हा
गुणगुणुनी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP