तनुजा चव्हाण - कितीदा तुझ्याशी भांडायचं?...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कितीदा तुझ्याशी भांडायचं?
तेच तेच वाद घालत बसायचं?
अव्यक्त्त, अबोल राहूनही
तू जिंकायचं, मी हरायचं
कितीदा तुझ्याशी भांडायचं?
दोघांत नको वाटतं कुणीच
त्या सावलीलाही टाळायचं
घेऊन सूर्य डोक्यावर मी
उन्हातून एकटीनं चालाय़चं
कितीदी तुझ्याशी भांडांयचं?
मी फ़क्त्त तुझंच गीत गायचं
तू तुझे बहाणे सागंत बसायचं
मग मी अशांत, अस्वस्थ व्हायचं
तु मात्र बिनधास्तच वागायचं
कितीदा तुझ्याशी भांडांयचं?
तू मस्त फ़ुलात राहायचं
मी काट्यांचं जगणं साहायचं
स्वप्नांना मी आवरायचं
अन् तु मात्र झोपेत हसायचं
कितीदा तुझ्याशी भांडांयचं?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP