ज्योती कपिले - आताशा मी टाळतेच माझं पुस्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आताशा मी टाळतेच
माझं पुस्तक कुणाला भेट म्हणून देताना
त्यावर त्या व्यक्तीचं नाव लिहिण्याचं !
बर्याचदा
अशी भेत म्हणून मिलालेली पुस्तकं
कुणी वाचतं, कुणी नाही....
आणि काळाच्या ओघात ती पुस्तकं सापडतात
रद्दीच्या दुकानात !
ठिकर्या ठिकर्या होतात
माझ्या मनाच्या
आणि म्हणूनच
आताशा भेट देताना
मी पुस्तकावर नावं लिहीत नाही कुणाचंही
प्जक्त सोबतच्या पत्रात लिहीते :
‘ मी हे भेट म्हणून देलीलं पुस्तक
आपनही भेट म्हणून द्यावं आपलं वाचून झाल्यावर.
अर्थात्, त्यावर कुणाचंही नाव न टाकता !
नाहीतर सापडेल आपल्यालाही
काळाच्या ओघात
ते पुस्तक रद्दीच्या दुकानात
आणि ठिकर्या, ठिकर्या उडतील
आपल्याही मनाच्या ....
माझ्या मनासारख्याच .... !
Last Updated : November 11, 2016
TOP