गजानन मते - झाडंझुडं झाली मुकी आणि प...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


पळस
झाडंझुडं झाली मुकी
आणि पाखरे अबोल...
शाल हिरवी उडाली
दरी-खोर्‍यातून खोल...

सूर्य तळपत आला
हिवं खात; पाणी पीत..
वारा सुसाट सुटला
धूळ-माती उडवीत...

आला फ़ुलून पळस
शेत -शिवारास लाली...
सुकलेल्या डोंगराच्या
हसू फ़ुटलेलं गाली...

रान उजाड वसान
झाला पळस केशरी...
गेली पाखरे फ़िरून
तरी मैफ़ल हसरी...

सळसळ पानोपान
हळहळलेलं रान...
विरहात जगण्याचं
पळसानं दिलं भान...

किती सोकू दे जमीन
हारू नको; धर तग...
ऊन्ह, वारा, तुफ़ानात
सांगे पळस: ’तू जग...’

Translation - भाषांतर
N/A

References :
९४२००७६८६७
Last Updated : 2016-11-11T12:52:32.1100000