मनीषा वाणी - बरं झालं देवा, दिली एक कन...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
बरं झालं देवा, दिली एक कन्या
तिच्यामुळे मला कळली ही दुनिया
तुरूतुरू चालताना बोलायचे पैजण
शोधा आली घरा, तिनं फुलवलं अंगण
बोबडे तिचे बोल, तिचे केस भुरूभुरू
बाबा आनंदून म्हणती, किती लाड करू ?
वाढू लागली लेक, झाली माझी आई !
काढू लागली चुका...म्हणे ‘ तुला कळत नाही ’ !
घरभर फिरत असते, खूप तिची बडबड
‘ मदत करते तुला ’ म्हणत करते किती गडबड !
येता - जाता घरात मला मारत असते मिठी
सदान्कदा नाव तिचेच माझ्यासुद्धा ओठी
खरंच का ही लेक कधी जाईल मला सोडून ?
नुसत्या विचारानंसुद्धा कंठ येतो दाटून !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP