मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
नसेल काहीही बोलत; पण समजत...

रणजित पराडकर - नसेल काहीही बोलत; पण समजत...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


नसेल काहीही बोलत; पण समजत असतो बाबा
आई जर का चिडली, तर समजावत असतो बाबा

नेहमीच हळवेपण त्याचे लपवत असतो बाबा
पाकिटातला फोटो चोरून पाहत असतो बाबा

क्षणाक्षणाला नोंदवून टिपणार काहीही नसतो
हिशेब गेलेल्या वेळेचा मांडत असतो बाबा

सहा वाजता गेल्यानंतर दहा वाजता येतो
पोरांना रविवारी केवळ भेटत असतो बाबा

घोडा बनतो, लपून बसतो, पकडापकडी करतो
आपल्याच तर बालपणाशी खेळत असतो बाबा

धडपडण्याची भीती गोंधळ उडवत असते तेव्हा
सायकलीला धरून मागे धावत असतो बाबा

दूर पसरल्या माळाच्या खडकाळपणाचे जीवन
एकटाच गुलमोहर होऊन डोलत असतो बाबा

रणरणती दुनियादारी मन रुक्ष कोरडे करते
एक कोपरा मनात गुपचूप भिजवत असतो बाबा

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP