मनोहर आंधळे - तुझं-माझं नातं ज्योती-पणत...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझं-माझं नातं
ज्योती-पणतीचं
गाणं उजेडाचं
गाऊ दोघं
क्षितिजाला जशी
स्वीकारते धरा
तिचे खराखुरा
भाव घेऊ
फुंकरू वा आता
सार्या जखमांना
मुक्या वेदनांना
धीर देऊ
उण्या-दुण्यालाही
नच देऊ थारा
प्रेमळ निवारा
होऊ गडे
तूच पावसाची
ओल जिव्हाळ्याची
मग उन्हाळ्याची
तमा काय ?
आता अंकरूनी
येतीलच कोंभ
हृदयीचे नभ
धन्य होई
लावू चल भाळी
संकल्पाचा टिळा
तुटू नये लळा-
कधीकाळी !
Last Updated : November 11, 2016
TOP