रेणू पाचपोर - नुकताच पाऊस पडून गेलेला ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
नुकताच पाऊस पडून गेलेला
जडावलेल्या फ़ांद्या
खालपर्यंत वाकलेल्या
अंग चोरून काळजीनं
कवितेच्या झाडाखालून जावं तर
किंचितसा धक्का कुठं लागताच
थेंबांचा खळकन् चुरा होऊन अंगावर पडलेला,
त्यासोबतच काही ताजे शब्दही
आणि शिरशिरी आतून-बाहेरून
शब्द असे निपचित पडलेले
आनंदाचा नाद आतल्या आत ऐकत
की बाहेरचं काहीही जाणवू नये
पापण्या मिटून अलगद
एकेक करून शब्द वेचताना
मऊ ओलसर स्पर्शही झिरपतात...
शब्दांचं अंग दुखू नये म्हणून
किती घ्यावी काळजी !
ओंजळभर जमा झालेले शब्द
देव्हार्यात ठेवावेत...
त्यांच्याकडं नुसतं पाहत राहण्यासाठी
हार करावा म्हटलं तर
जाईल सुई
प्रत्येकाच्या हृदयातून आरपार...
त्यापेक्षा भावनेचं सूत तोलून धरेल
त्यांचं आयुष्य निराधार
देव्हार्यातल्या मंद उजेडात
ठेवलं त्यांना सुखरूप
आता निदान सुखानं पहुडतील तरी तिथं...
कदाचित त्यांच्या संवादातून
जन्मेलसुद्धा
कविता !
N/A
References :
९९७५०६००९०
Last Updated : November 11, 2016
TOP