अरुण तीनगोडे - मला माझंच विस्मरण होताना ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मला माझंच विस्मरण होताना
मला तुला विसरता आलं नाही, हे प्रेम
तू क्षणाक्षणानं माझ्यापासून दुरावताना
मला तुला काळजाशी लावता आलं नाही, ही वेदना
तुझी आसवं ओघळताना हे थोटे हात
तुझ्यापर्यंत पोचू शकले नाहीत, ही अगतिकता
मी असाच बेवारस कुजताना
मला तुझी माती शोधता आली नाही, ही खंत
तुझ्यातला कोंब अंकुरताना
मला तुझं बीज होता आलं नाही, ही यातना
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP