प्रभाकर तांडेकर - उत्साही चित्रकार वेदनेचे ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
उत्साही चित्रकार
वेदनेचे रंग, घामाचं पाणी
आणि नशिबाची कहाणी एकत्रित करून
बोटांच्या कुंचल्यानं
जिवंत चित्र रेखाटतो कॅनव्हासवर
’नेमकं बोलणारं’ असं चित्र!
भरतो त्यात रंगसंगतीचं अनोखं मिश्रण
आधुनिक तंत्रज्ञनानं आता मात्र
त्याला दिला आहे बेरोजगारीचा आहेर
उपासमारीनं कंपित होऊ लागली अहे
त्याच्या जिंदगीची आधारशिला
त्याच्या रक्तवाहिन्यांची
थंडावली आहे गती
ग्राहक शोधण्यातच
थकून गेली आहे त्याची नजर
बिचारा... आता खेटून बसलेला असतो
पडक्या घराच्या भिंतीच्या कोंदट कोपर्यात
उदासीनं रंगलेला म्लान चेहरा घेऊन
ऑर्डची वाट पाहत
आणि दिसू लागतो खुद्द
कॅनव्हासवरच्या चित्राप्रमाणे
निश्चल...निर्जीव!
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP