वसंत शिंदे - ... गाव हरवला आहे कौलांन...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
... गाव हरवला आहे
कौलांनी शाकरलेला गाव हरवला आहे
गोठ्यांनी गंजबजलेला गाव हरवला आहे
ती कुठे शिवारे गेली ? ती गुरे कुठे हंबरती... ?
घुंगरांनी नादवलेला गाव हरवला आहे
पक्क्या सडकांमध्ये हरवल्या धुळीच्या वाटा
वनराईने नटलेला गाव हरवला येई
आता न साद राघूची मैनेसाठी येई
आमराईत मोहरलेला गाव हरवला आहे
ओढ्याचे अवखळ पाणी गुणगुणणेच विसरले
पाटातुन खळखळलेला गाव हरवला आहे
चिमण्यांची शाळा जेथे रांगेत भरे पूर्वी
त्या तारेवर झुललेला गाव हरवला आहे
शहरांनीं टापांखाली चिरडली अशी ही गावे
माळावर विसावलेला गाव हरवला आहे
नातवास निजण्यापूर्वी गोष्ट हवी ‘ हॅरी ’ ची
आजीने जोजवलेला गाव हरवला आहे
त्या पिंपळवृक्षाखाली रंगायाच्या गप्पा
पारावरती बसलेला गाव हरवला आहे
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP