अभिषेक अष्टेकर - आला पाऊस गावात झाली दिवसा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आला पाऊस गावात
झाली दिवसाची रात
आणि अंधार्या घरात
जळे दुपारची वात
आला पाऊस गावात
वारा सुटला जोरात
शीळ घालीत सुरात
निघे पानांची वरात
आला पाऊस गावात
वाजे ढगांचा नगारा
झाले पक्षी सैरावैरा
कुठे शोधती निवारा ?
आला पाऊस गावात
त्याची आगळीच भाषा
ओढी नभावर रेषा
वाजे छतावर ताशा
आला पाऊस गावात
लव्हाळली ओली माती
नवकुसुमांच्या ज्योती
झाडाझुडपांच्या हाती
आला पाऊस गावात
पाणी खेलले पाटात
धान्य रुजले शेतात
मोद मावेना उरात
आला पाऊस गावात
ज्वानी पडली प्रेमात
पावसाळी या ज्वरात
आली नवती रंगात
आला पाऊस गावात
आला कुणा न सांगता
त्याला पाहता पाहता
सुचू लागली कविता
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP