मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
प्रेमभाव दोन्हीकडे उमलतो ...

मैथिलीशरण गुप्त - प्रेमभाव दोन्हीकडे उमलतो ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


प्रेमभाव दोन्हीकडे उमलतो
सखि, पतंगही जळतो...!
दीपही जळतो !

मान लववुनी दीप विचारी
‘ बंधो, का जळण्यात हुशारी ? ’
...तरी झेप घ्यायची तयारी !

आहे किती विव्हल तो

प्रेमभाव दोन्हीकडे उमलतो !

प्राण वाचवुन कसले जगणे ?
प्रेमावाचुन उगाच तरणे...
जळल्यावाचुन व्यर्थच मरणे !

होई का असफल तो ?

प्रेमभाव दोन्हीकडे उमलतो !

पतंग म्हणतो मारुनिया मन
‘ तू महान, मी लहान रे, पण
मरणाचाही नच हाती क्षण ?

शरणभाव ना मजसी छळतो ’

प्रेमभाव दोन्हीकडे उमलतो !

दीप जळे ती जणू दिवाळी
जळण्यामधली शान निराळी !
काळरात पण पतंगभाळी !

अगतिक आणि विकल तो !

प्रेमभाव दोन्हीकडे उमलतो !

जग व्यवहारी बनून येई
मिळेल तेथुन लाभच घेई
घटिताला ते महत्त्व देई

मला परंतू सल हा सलतो !

प्रेमभाव दोन्हीकडे उमलतो !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP