विलास माळी - भर उन्हातान्हात वारेमाप ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
भर उन्हातान्हात
वारेमाप कोरड्या दुष्काळात
कोमेजल्या रोपांसाठी
मी पाऊस पेरतो...
तुम्हीच जपून ठेवलेल्या ;
पण आता गंजत चाललेल्या
माणुसकीच्या या झारीतून
मी थंडाव्याचे तुषार पेरतो...
कधी ना कधी
माणूस कोंबावून येईल
याची वाट पाहतोय मी !
नीलाकाशाएवढां पाणीसांठा
नक्कीच आहे माझ्या अंतरात्म्यात
आणि मातीच्या गर्भारपणाची
हमीही शाश्वत आहे
मनाच्या खोल ओलाव्यात
म्हणून तर ही सूर्यकिरणांची रोपं
मातीच्या खोल ओलव्यासकट
रुजवलीत मी
मनाच्या तळघरात !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP