कमलाकर देसले - तुझ्या - माझ्यातल्या दुरा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझ्या - माझ्यातल्या दुराव्यानं
मिटणार असेल आपल्यातलं अंतर
नि येणार असू आपण अधिक जवळ
तर काय हरकत आहे
आपण दूर जायला ?
माहेर सोडणार्या लेकीला
डोळे मिटल्यावर
गाडी मागंच जात असल्यासारखं वाटतं
अगदी तसंच नाही का वाटत
तुला - मला...
तुला - मला सोडताना ?
चल, आपण निघू या विरुद्ध दिशेनं
जाऊ या इतके दूर
की त्यांचा विश्वास बसेल
आपण कायमचे दुरावल्याचा
त्यांना अजून दुसर्या दोघांना दुरावायचं आहे !
ते आपला पाठलाग सोडतील कंटाळून
जाऊ या इतके दूर...
जिथं आपण जवळच येणार नाही फ़क्त
तर होऊन जाऊ एकच !
तुझ्या - माझ्यातल्या दुराव्यानं
मिटणार असेल आपल्यातलं अंतर
तर काय हरकत आहे
आपण दूर जायला ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP