कीर्ती मराठे - जेव्हा आपापल्या आयुष्यां...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जेव्हा
आपापल्या आयुष्यांमधले
चांदण्याचे संदर्भ बदलायला लागतात
तेव्हा समजायचं
की प्रवास मध्यावर आलाय
कुणाला चांदण्याची सोबत
कुणाला सोबतीचं चांदणं
खरं तर
आशा-निराशा, यश-अपयश
अपेक्षा नि अपेक्षाभंगाचे
उभे-आडवे धागे गुंफताना
या धाग्यांतच गुरफटायचं
की दोन पावलं मागं सरून
एखाद्या कसबी कलाकाराच्या नजरेनं
हा चांदणंपट तटस्थपणे न्याहाळायचा
हे ज्याचं-त्यानं ठरवायचं
एक मात्र खरं
की ज्याला न्याहाळणं जमलं
त्याच्यासाठी
पुढचा प्रवास म्हणजे....
आकाशगंगा
N/A
References : N/A
Last Updated : December 30, 2017
TOP