बाबू फिलीप डिसोजा - हळव्या पाऊलवाटेवर हळवे झा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
हळव्या पाऊलवाटेवर हळवे झाले मन
हळव्या आभाळावर कसे हळवे झाले घन
हळव्या गर्द हिरव्या रानी रावे झाले हळवे
सोसवेना जरासा आघातही हलवे झाले तन
हळवी पाऊसधारा वर्षावते रिमझिम सम
हलवे अंकुर गोंजारी मायेने दिलेले वचन
हळदुली पाती धानांची हळवी हवा सांद्रनम
हळव्या पाझराने मृदगर्भी अंतर्दाह शमन
ऊनसावली श्रावणखेळी पानांफुलांत गुंजन
हळव्या पाखरांना साद हिरवी घालते गगन
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP