कुमारेंद्र पारसनाथ सिंह - ती नाहतेय चमकत्या उन्हात ...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ती नाहतेय चमकत्या उन्हात
नदी...
चमचमतं ऊन्ह खळाळतंय
तिच्या अंगोपांगावरून...
एक परिचित सुगंध
जाणवतोय मला माझ्यासमोर
जणू काही सदेह, साकार कविताच !
हे ठिकाण, इथली धरित्री...
किती एकान्त आहे इथं...
एवढी नीरवता की
अवकाशातल्या चाहुलींमध्ये
या धरित्रीचाही कानोसा सहज घेता यावा !
आकाशाचा निळा निळा विस्तार
इथं अधिकच
आत्मरत, अंतर्मुख, गहनगहिरा वाटतोय...
शब्दाला जणू येत जावं अर्थरूप, तसा !
आणि नदी न्याहाळतेय तिचं रूप त्याच्या डोळ्यांत !
आकाशाचे मौनस्वर
स्पर्शून जात आहेत
तिच्या कानांना
आणि मग ती गुणगुणू लागते
एक गाणं...
तिच्या आतलं...
खूप खूप आतलं...
एक चिमुकलं हिरवं रोप
सूर्याच्या दिशेनं हात उभारून
झेपावत चाललंय
वर...वर...
एकसारखं !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP