वर्जेश ईश्वरलाल सोलंकी - तुमची त्वचा चाटू शकतं कुण...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुमची त्वचा चाटू शकतं कुणीही लपलप
व उपटू शकतं तुमच्या झिंज्या
कुणीही
तुम्ही सापडता कुणाच्याही हातात
अगदी गोगलगाईसारखे
व तळहातावर नाचवलं जातं तुम्हाला
भोवर्यासारखं
तुम्ही विव्हळत असता केरटोपलीत
पहाटेच्या अंधाराचा घेतलेला असतो
फायदा
कुणीतरी
केलं जातं एखाद्या गल्लीत किंवा
चौथर्यावर तुम्हाला विवस्त्र
सोलावी एखादी मोसंबी लहानग्यानं
इतक्या सहजतेनं
कुकरची शिट्टी ऐकून पुन्हा त्यावर
आधण ठेवावं
तशी ऐकली जाते तुमची किंकाळी
व दूध पातेल्यातून उतू जाण्याआधीच
फुंकर मारून
शांत शांत केली जाते
तुम्हाला फुटलेली उकळी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP