वीणा पुरोहित - भाऊ मुर्हाळी दारात, जीव ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
भाऊ मुर्हाळी दारात, जीव हरखून केला
` धाडा सईला माहेरा ' त्यानं सांगावा आणला
त्यानं सांगावा आणला तिचा माय नि बापाचा
आला सण पंचमीचा...आला सण पंचमीचा
झोका झाडाला बांधला, मन उडालं खुशीत
गेलं माहेराच्या वातं, शिरं मायच्या कुशीत
शिरं मायच्या कुशीत, दिसं घराचं अंगण
झाडा - वेलींच्या जाळीत खेळणारं बालपण
बालपणाच्या डोळ्यांत आठवणींचं चांदणं
आणि पाउलं चालती... पुढें रानाची पांदण
पांदणीच्या पुढं दिसं, दिसं मोटंवर राया
ऐटदार मंदिलाची त्याच्या डोईवर छाया
धरी साजणीचा हात, शब्द ओठांत अडला
` कधी येशील फिरून ? जीव तुझ्यात गुंतला...'
जीव झाला वाराहुरा, सई बघंण मागं - पुढं
कसं निघावं पाऊल ? दोन्हीकडं मनां ओढ !
एका रातीच्या बोलीनं, सई माहेरा निघाली
मागं - पुढं दोन्हीकडं, वाट डोळ्यांत भिजली !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP