विनायक अनिखिंडी - शून्याचं मोल खरचं फार असत...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
शून्याचं मोल खरचं फार असतं !
सगळ्या जगाचं मातृत्व
शून्यमधेच दिसतं...
पहिल्या आकड्यानंतर
शून्यच खेळ करतो
कशालाही गुणा याला
शेवटी शून्यच उरतो
शून्यात विलीन झाल्यावरच
खरा मोक्ष मिळतो
शून्यात नजर लावून बसता
काही अर्थ गवसू लागतो
शून्य तसा हुशार...
फार कसलेला
गरिबाच्या खिशात
नि
श्रीमंताच्या हृदयात
सदा बसलेला !
शून्याची किंमत काय असते ?
फक्त शून्य
झाला शेवटी सज्ज
तर कोटींचेही अब्ज !
असा अमूल्य ‘ शून्य ’
भारतानं जगाला दिला
तेव्हा कुठं जग निघालं
प्रगतीच्या वाटेला !
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2017
TOP