मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
युगे झाली, कुठे कुंपण बदल...

जयदीप जोशी - युगे झाली, कुठे कुंपण बदल...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


युगे झाली, कुठे कुंपण बदलले ?
बरे झाले, तुझे अंगण बदलले !

तुला समजावले, घर शांत झाले
तसे भांडायचे कारण बदलले !

कसेही साजरे करतात हल्ली
किती आहेत सगळे सण बदलले !

प्रवासाला हवे होते बरोबर
कुणी या फोनमधले क्षण बदलले ?

मनाचे दार का आवाज करते ?
कधी होतेस तू व्म्गण बदलले ?

बिकट झाली कपाटाची अवस्था
रिकामे ठेवल्याने खण बदलले

त्वचेने बंड का केले असावे ?
किती होतेस तू साबण बदलले !

हवेसोबत उडत डोळ्यात गेले
दगड झाले, धुळीचे कण बदलले !

दिली होती तुला मी भेट पूर्वी...
तुझ्या पायातले पैंजण बदलले !

युगांचा बेत आपण आखलेला
क्षणार्धातच तुझे धोरण बदलले !

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP