गो. शि. म्हसकर - दुष्काळाने पोखरले बळीराजा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
दुष्काळाने पोखरले बळीराजाचे काळीज
कशीबशीच साजरी दिवाळी नि भाऊबीज
दूर झोपडीत झाला गोरा उजेड आंधळा
महागाईने दाबला गोरगरिबांचा गळा
रांगोळीच्या रंगांनीच केला अंगणाला डंख
पोशिंद्याच्या ओंजळीत काळ्या प्रकाशाचे पंख
पणतीच्या पापणीत आसू काळोखाचे आले
दिवाळीला आनंदाचे कसे दिवाळे निघाले
जोंधळ्याच्या कणसाला नाही दाण्याचा तपास
गुरा - ढोरांसाटाही केला जसा धरेने उपास !
मंद जळते पणती...तिला उजेडाचा भार
उजेडाच्या श्वासातून गळू लागला अंधार
कास्तकाराच्या मनाचा सारा उत्साह भंगला
दिवाळीत दुष्काळाचा असा उत्सव रंगला !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP