वैशाली मोहिते - किती तर्हा असतार नाही बा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
किती तर्हा असतार नाही बाईपणाच्यासुद्धा ?
आई, मुलगी, बहीण, सून, बायको... आणि पायातली वहाणसुद्धा !
देव प्रत्येकालाच माणूस म्हणून जन्माला घालतो म्हणे
पण इहलोकात आल्यावर तयार असलेला
’बाई’ नावाचा मुखवटा
माणसाच्या चेहर्यावर डकवला जातो काय....
आणि माणूस ’बाई’ होते काय...
सगळंच जातं बदलून !
...बाई गं,
तू तुझ्या कक्षा किती रूंदावल्यास...
सहजपणे पोळपाट-लाटणं, स्तिअरिंग व्हील हाताळत...
मोबाईलवरून सारं सारं हँडल करत करत
भटकत असतेस तू स्वत: तला माणूस धुंडाळत...
तू कितीदा तरी ठरवलंस, की आता माणूस म्हणूनच जगायचं
मात्र...
’बाईपणाला हे शोभत नाही,’
असं कुणीसं बजावलेल आठवतं तुला लगेचच...
मग
डोळ्यांतलं पाणी विसरून, ओठांवर गाणी खेळवत
मन चिडीदूप होतं तुझं
आणि पुन्हा स्वत:लाच बजावतेस तू :
’माणूस’ म्हणून जगता नाही आलं, तरी ’माणूस’ म्हणूनच मरायचं !
या दिलाशानंतर
तुझं मन, बुद्धी फ़िरत राहते बाईपणाच्या चाकोरीत...
अव्याहत !
N/A
References :
९५२७७३८९८३
Last Updated : November 11, 2016
TOP