अनिल राऊत - थोडा मीही घेतलाय विसावा त...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
थोडा
मीही घेतलाय विसावा तेव्हा...
याच वृध्दाश्रमात
आता आलाय वाटयाला
कायमचा मुक्काम... याच वृध्दाश्रमात
...तेव्हा पुसले नव्हते अश्रू
बापाच्य डोळयांतले
आणि
कळलीही नव्हती वेदना
बाप असण्याची
आज
हिशेब पूर्ण झालाय
मात्र उद्या?
उद्या ढासळायला हव्यात
या वृध्दाश्रमाच्या भिंती
माझ्यातल्या बापाचं काळीज
बोलतंच असं...
कदाचित
माझ्याही बापाचं काळीज
असंच बोललं असेल...
पण,
कुठं ऐकलं या भिंतींनी ?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP