प्रकाश बनसोड - घाम बापाचा ससा शेतीत जिरत...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
घाम बापाचा ससा शेतीत जिरतो
त्यामुळे वस्तीत या बाजार भरतो
कोरडा परतून जातो पावसाळा
पूर अश्रूंचाच या डोळ्यांत उरतो
अन्नदात्यावरच का ही वेळ येते ?
कर्ज मागायास दारोदार फिरतो !
गांजलेल्यांना कुठे जावे कळेना
घाव जो तो थेट पोटावरच करतो
का इथे या कष्टकर्त्या माणसाचा
गाय - बैलासारखा हा जन्म सरतो ?
प्रश्न हा इथल्या व्यवस्थेलाच आहे
बाप का माझा जहर घेऊन सरतो ?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP