डी. के. शेख - मी बोलत असतो सतत माझ्या क...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मी बोलत असतो सतत माझ्या कवितेशी
सांगत असतो तिला माझी सुख - दुःखं
तिच्यासमवेतच मी हसतो
तिच्यासमवेतच पाणावतात माझे डोळे
संकटाच्या काळात तिचाच
कणखार खांदा असतो टेकवायला मान
उदास मनःस्थितीत
माझ्या पाठीवर तिचाच असतो मायाळू हात
खोल जखमेवर
लावायला मलम
घालायला फुंकर
कविताच येते धावून
मी कवितेतून हसतो - रडतो - नाचतो
चित्रं रंगवतो - स्वप्नं पाहतो...
सगळं सगळं मी करतो कवितेतूनच !
मी कवितेतून वाइटाला देतो शिव्या
मी कवितेतून चांगुलपणाच्या गातो ओव्या
मी जिवंत आहे...जिवंत आहे मी
कविता माझ्यासोबत आहे म्हणून !
N/A
References : N/A
Last Updated : April 24, 2017
TOP