मनिषा पाटिल - तुझ्या कष्टाला वैशाख साक्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझ्या कष्टाला वैशाख साक्षी
बाई, दुःखाचं पितेस जहर गं
जिणं मातीचं...कुणा ना कदर गं
तुझ्या मनात जगाची भीती
किती, कुठल्या जपाव्या रीती
नाही कळला, कसा मळला
तुझ्या जुनेर लुगड्याचा पदर गं
मनी गोंदली नात्यांची नक्षी
तुझ्या कष्टाला वैशाख साक्षी
मन जाई तुझं, मन जुई तुझं
तरी करपे सुखाचा बहर गं
मूक जगत राहशी अशी...
वेल झाडाला बिलगे जशी
मनी कुढशी, उगा झुरशी
ओली पापणी टाळते नजर गं
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP