धनंजय तडवळकर - आजोबा, गोष्ट सांगा ना ’ म...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आजोबा, गोष्ट सांगा ना ’ म्हणत
तो मांडीवर यायचा
अन् गोष्ट ऐकताच शांत झोपी जायचा
त्या वेळी माझ्याशिवाय
त्याला कुणीच नको असायचं
तो झोपला, असं समजून
मी गोष्ट थांबवलीच तर
तो डोळे मिश्किल करून
माझ्याकडं पाहायचा
अन् मला ती गोष्ट पुरी करावीच लागायची
तो हळूहळू मोठा होत गेला
अगदी मांडीत न मावण्याइतका
अन् निसर्गनियमानुसार मी मिटत चाललोय...
आता बदल इतकाच झालाय...
त्याच्या मांडीवर मी डोकं ठेवतो
अन् त्यानं गोष्ट न सांगताच
मला समाधानाची गाढ झोप लागते...
एक दिवस कदाचित कायमचीच...!
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017

TOP