वीरा राठोड - हा माणूस किती विखारी होता...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
हा माणूस
किती विखारी होता
किती क्रूर होता
तू फ़क्त ओठच टेकवलेस
एक साधं चुंबन घेतलंस...
तर बघ
वितळून - पिघळून नाचू लागला
कळसूत्री बाहुल्याप्रमाणे
सार्या नाड्या तुझ्या मुठीत देऊन
किती बारूद भरलंय तुझ्यात बाई !
ही मर्दुमकीचे ढोल बडावणारी व्यवस्था
अगदी सहज
हसता हसता
उलथवून लावता आली असती तुला
तू फ़क्त
वातच शिलगवायची
विसरून गेलीस !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP