मीनाक्षी पाटोळे - आमच्या जुन्या पडक्या वाड्...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


जातं
आमच्या जुन्या पडक्या वाड्यात
दिसलं एक जातं अगदी कोपर्‍यात
जणू थोडंसं हिरमुसलेलं
आपल्याच कोषार असलेलं

असंख्य जाळ्यांनी भरलेलं
कोळ्यांचा महालच जसा काही !

वाटलं,
किती खंत असेल त्याच्या मनात ?
कधीकाळी असेल त्याचाही एक गाव
आणि त्यात त्याचं छोटंसं गाव
आता ते गावही नाही नि नावही
उरलंय फ़क्त एकटेपण
तेच जगतंय ते जिवापाड

हे जातं म्हणजे
कितीतरी सासुरवाशिणींचा
असेल एक्मेव सखा
त्याच्याशी गुजगोष्टी कर
रचल्या गेल्या असतील कितीतरी ओव्या...
कितीतरी गुपितं अजूनही असतील त्याच्या हृदयात...

खरचं, मिळेल का जात्यासारखा असा एखादा दोस्त
गाँसिपिंगच्या आजच्या या जमान्यात ?
 
जात न पाहता ज्यानं केली
स्त्रीच्या दु:खाला सोबत ते ’जातं’
तिच्या वेदनांनाही
त्यानं केलं सुरेल गातं !
जन्मोजन्मीचं अतूट
त्याचं नि तिचं नातं

आता त्याच्या या पडत्या काळात,
’पडून राहत्या’  काळात त्यानंही करावं त्याचं दु:ख
माझ्याकडं रितं...!

Translation - भाषांतर
N/A

References :
८३७९८२९५४५
Last Updated : 2016-11-11T12:52:32.3270000