विलास कदम - माझ्या मनातील मन तिला सम...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझ्या मनातील मन
तिला समजले नाही
तिच्या मनातील मन
मला गवसले नाही.
मन गवसले नाही
तरी फसविले नाही
थोडे दुखविले खरे
तिने चुकविले नाही.
माझी कविता अशी ही
नाकासमोर चालते
आजू बाजूला पहाणे
तिला जमलेच नाही.
तिच्या सोबती शिवाय
दिस मावळत नाही
तिच्या शिवाय माझा मी
बाकी राहीलोच नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP