आर. एम. मालुंजकर - देह मानवाचा मिळे एकदाच वा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
देह मानवाचा मिळे एकदाच
वाट अर्ध्यातच तोडता का ?
जगताना तुम्ही करा सत्य कर्म
आयुष्याचे मर्म आहे हेच ॥
हात मदतीचा द्यावा इतरांना
सत्याचा जमाना नका सोडू ॥
आनंदाचा तुम्ही करा शिडकावा
डोके शांत ठेवा नियमित ॥
दिवस आजचा आहे महत्त्वाचा
नाश कधी त्याचा नका करू ॥
आयुष्यात कधी आलीत संकटे
माघारी एकटे फ़िरू नका ॥
करू नका कधी माणुसकी वजा
तेव्हा खरी मजा मिळे तुम्हां ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP