मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
एक खेळ असतो... काहींचा आव...

ऋत्विक व्यास - एक खेळ असतो... काहींचा आव...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


एक खेळ असतो...
काहींचा आवडता, काहींचा नावडता...
आवडणार्‍याला झिंग चढवेल
नावडणार्‍याला आकर्षक वाटेल असा
हा खेळ कमालीचा धुंदीचा...!

सोंगट्याही आहेत,
ज्यांचं शरीर पशूंचं; पण स्वभाव मानवी !
तिरकं शिरून थेट पोट फोडणार...
सरळमार्गी असूनही आक्रमक...
नाकासमोर पाहत दबकत चालणार...इत्यादी
इथंहे थोरा - मोठ्यांना भाव शेवटी शेवटीच
यांनाच कोसळवण्यासाठी खरंतर हा खेळ !
शेवट नेहमीच तणावाचा...

गंमत अशी की
इथं सगळ्याच सोंगट्यांना ‘ तो ’ हे संबोधन !
तो राजा, तो प्रधान, तो वजीर वगैरे
या सगळ्यात ‘ ती ’ कुठंच नाही;
पण यांना खेळवणारी ‘ ती ’ च असू शकते...
नव्हे ! ‘ ती ’ च तर असते !

खरंच ‘ बुद्धीचं बळ ’ लागतंच
हा खेळ खेळताना... !

ज्याला कळेल तो जिंकेल...

नाहीतर चेक ऍंन्ड मेट... !

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP