मेघना वाहोकार - अजून पुरतं उजाडलेलंही नसत...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अजून पुरतं उजाडलेलंही नसतं.
चहा घेण्याआधीच हाताला चटका गॅस स्टोव्हचा
आणि देह व्यापून नुसती ठसठस...
कामवालीचा मोबाइल नखर्यात :
“ आज मी येणार नाही जा कामावर ”
तिकडं उघडावाघड भांड्यांचा ढीग...
रात्रभर पाण्यात गुदमरलेले ओले कपडे...
आणि घर पारोसं...ताटकळलेलं...
पोरांचे मित्र हॉलभरून चेस खेळत...
त्यांचं घरभर हसणं - खिदळणं, गावगप्पा...
आणि खाण्यासाठी हट्ट निरनिराळे...
गावावरून फ़ोन घरातल्यांचा :
“ घराचं बांधकाम रखडलंय...पैसे पाठवा...”
परवाच भरलेली असते कॉलेजची फ़ी मुलांची
होतं माझं गरगरतं पिवळं पान वावटळीतलं
न वाचलेले रविवारचे पेपर हसत असतात
दात विचकून आडव्यातिडव्या संसारावर
हातातली काचेची वरणी ठस्कन् फ़रशीवर
काही कळण्याआधीच
जात्यापात्यात भरडला जातो सुट्टीचा रविवार !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP