सदानंद गोखले - मला सांगा काय करायचं आता...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मला सांगा
काय करायचं आता
या कोर्या चेहर्याच्या माणसांचं?
भाव दिसत नाहीत कुठलेच
या सगळ्या मुद्रांवर...
पूर्वी कधीतरी यांचे
डॊळे तरी बोलायचे
आज तेही भाव- भावनांचे
कल्लोळ जणू विसरुन गेलेत...
बोलत नाहीत कुणी कुणाशी
चार मित्र एकत्र आले तरी
वाचतात, लिहितात
फक्त मोबाइल स्क्रीनवर....
थँक यू.... साँरी...
सगळं ओठ मिटून
म्हणजे लिहितात तशी अक्षरं
पण साद- प्रतिसाद
सगळं काही मूकपणे चालतं....
मोठयानं ओरडावं, गावं
निदान रडावं
असं यांना कधी वाटतच नाही का?
यांचे ओठ शिवलेले असतात....
डोळेही अश्रू गळत नाहीत...
मला सांगा
काय करायचं आता
या कोर्या चेहर्याच्या माणसांचं ?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP