अनिल कांबळे, - जिथे सूर्य अंधारला दोस्त ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जिथे सूर्य अंधारला दोस्त हो
तिथे दीप लावू चला दोस्त हो
कळे दुःख ज्याला दुज्यांचे इथे
असे तोच बंदा भला दोस्त हो
पुन्हा पेटली एक वस्ती तिथे
पुन्हा जाहला गल्बला दोस्त हो
मिळाली मला अक्षरांच्या सवे
व्यथा सोसण्याची कला दोस्त हो
उषःकाल होईल केव्हातरी...
पुढे जाउ द्या काफला दोस्त हो
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP