शुभदा दीक्षित - मूक झाले शब्द माझे स्तब्ध...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मूक झाले शब्द माझे
स्तब्धल्या संवेदना
मौन झाल्या भावनाही
सुन्न झाल्या चेतना
सूर जरि हा वेदनेचा
खोल हृदयी गोठला
जीवनाच्या भैरवीचा
षड्ज आता लागला !
तृप्त झालो...जाउ द्या मज
ढाळता का आसवे ?
या निरोपाच्या क्षणाला
हासू असो तुमच्यासवे
पैल नेते वाट मज जी
देखणी आहे किती
मजपुढे साक्षात मृत्यू...
भासतो सुंदर अती !
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP