मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
मी आहे एकनिष्ठ शेतीमातीश...

बा. भा. सोनवणे - मी आहे एकनिष्ठ शेतीमातीश...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


मी आहे एकनिष्ठ
शेतीमातीशी.
राहिलो विसंबून ठेवून विश्वास
आपल्या मायावी कृतींवर.
आभाळ-पाण्यावर...
रिकाम्या ओंजळीने
गहिवरत विस्तारतो
डोळ्यातून
टपटपतो
जगण्यासाठी धडपडतांना व्यर्थ
बचावासाठी हाकारतो
तीक्ष्ण उन्हात
अथवा
अतिवृष्टीत पिकासह सडतांना
बांधावरल्या गवतासारखा
तुडवला जातो
सर्वांसमक्ष
सर्वांसाठी
माझ्यासाठी तुम्हाला शब्द फ़ुटतात
सभागृहात
मी भट्टीत असतांना उन्हाच्य़ा.
अथवा
अतिवृष्टी बर्फ़वृष्टीत होरपळताना.
माझं हरवत चाललंय चैतन्य
आता होतं ओझं
वांझ संवादाचं
मी सोडून देतो
निरर्थक आश्वासनाचं फ़ोलपट
सैरावैरा धावणार्‍या वार्‍यावर.
क्षितिजावर
उमेदीचे नवे दिवे
उमलण्याची वाट पाहतांना
जगण्याच्या धगीची
होतेय राख.
कोठवर पाहू वाट ?
जोखडातून शेतीच्या
काढून घ्यावी म्हणतो मान...
माझा
सोशिकतेचा आणि समजुतदारपणाचा
मावळत चाललाय दिवस...

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP