मयूर बटावळे - भेदूनी काळोखाला कनकगोळ तो...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
भेदूनी काळोखाला कनकगोळ तो सूर्य वरती आला
राजा छत्रपती शिवाजीमहाराजांचा तेव्हाच जन्म झाला
जुलूम अन्याय गुलामीची, वेळ होती जातीपातीची
तेव्हाच महाराष्टात चमकली तलवार शिवरायांची
स्वराज्याचे धडे शिकवले जिजाऊसाहेबांनी
लढाई न् कारभाराचे दिले शिक्षणही त्यांनी
साथ धरूनी मावळ्यांची हात घातला स्वराज्याला
तोरणा जिंकून पहिला, राज्य उभारलं रायगडाला
धर्मांधतेने मूर्ती भंगल्या जेव्हा तुळजापूर - पंढरपुरी
शिकस्त दिली अफजलखानाला प्रतापदुर्गावरी
लाल महाली बोटे तोडली शाहिस्तेखानाची
आग्र्याहून करूनी सुटका खोड मोडली औरंगजेबाची
शूर आमचे राजे शिवाजी कोणापुढे ना झुकले
ज्यांनी केली बगावत ते - ते सारे जीवास मुकले
सूर्याचे ते तेज प्रतापी संजीवनी महाराष्टाची
अवतार शिवशंभुचा आहे शान राष्ट्राची
पराक्रमाच्या आहेत कथा, होती सिंहासारखी छाती
घोड्यावरचे रूप मनोहर, साक्ष देते मराठी माती
हर हर महादेव गर्जती मराठे, होई शिवजन्मदिन साजरा
जय भवानी जय शिवाजी, करू या शिवरायांना मुजरा
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP