कैलास दौंड - शेतकर्यानं करावी अशी एक...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
शेतकर्यानं करावी अशी
एकच गोष्ट बिंबवली जाते
सतत मनावर त्याच्या
त्याला दिले जातात
शेतीवरच भार हलका करण्याचे सूचक संदेश
त्याला दाखवलं जातं आमिष
आत्महत्येनंतर मिळणार्या लाखभर रुपयांचं
कर्ज, सबसिड्या, वीजबीलमाफी, खत - बियांची मुबलकता
रोजंदारीनं काम करण्याचं
आणि त्याबदल्यात आयात केलेला गहू
मिळवण्याच्या योजना
सतत ओतल्या जातात त्याच्या कानात
कारण,
मेंदूला कळावं की, या सगळ्यांची तुला खूपच गरज आहे !
तुझ्या शेतातलं धान्य तर तुला खायलाही
शिल्लक राहणार नाही
ज्या आशेनें पेरतोस घाम
एखादा छदामदेखील तुला उरणार नाही
म्हणून रोजगाराची हमी देताहेत ते !
शेती करायची असेल तर,
ते बिंबवत असलेल्या गोष्टी नीट समजून घे
आणि
दाखव जगाला की
सुचवण्यापेक्षा वाचवणं किती महत्त्वाचं असतं ते !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP