यामनी रानडे - पूर्वी आपलं घर कसं शांत श...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पूर्वी आपलं घर कसं शांत शांत असायचं
बोलणारा तू एकटाच
मी फक्त श्रोता
तुझ्या ' हो ' ला ' हो ' करून
नुसती मान डोलावणारी
कधी चारचौघांत
बोलायची वेळ आलीच तरी
नजर कायम तुझ्याकडं
तुझ्या नजरेच्या इशार्यावर माझं बोलणं
वर्ष अशीच सरली
मुलगा मोठा झाला
आता घरात दोन आवाज येऊ लागले
बोलताना माझी नजर आता दोघांकडं
अचानक एका शिबिरात
' स्व ' ला शोधताना
मी मलाच सापडले
नंतर घरातून
तिसरा आवाजसुद्धा येऊ लागला
ठाम आणि स्वतंत्र विचारांचा !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP